आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी ‘शिकू आनंदे’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली- शिक्षण क्षेत्राकडून समाजाच्या अपेक्षा वाढत आहेत; मात्र त्या अपेक्षित वेगाने पूर्ण होताना दिसत नाहीत. या क्षेत्रात व्यावसायिकता वाढल्याने समाजासाठी हे क्षेत्र म्हणजे दुखरी बाजू झाली आहे. यावर उपाय शोधण्यासाठी सांगलीतील लुल्ला चॅरिटेबल ट्रस्टने सांगली परिसरातील १०० शाळा निवडून विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि शिक्षण संस्थाचालक यांना शैक्षणिक गुणवत्तावाढीबाबतच्या समाजाच्या अपेक्षांची जाणीव करून देण्यासाठी ‘शिकू आनंदे’ हा कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमातून निघणारे निष्कर्ष शासनाला सादर करण्याचाही या संस्थेचा मनोदय आहे.

व्यावसायिकरणामुळे शैक्षणिक गुणवत्ता विकासाकडे सर्वच पातळ्यांवर दुर्लक्ष होताना दिसते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी केवळ आपली नाही, ही भावना शिक्षक, शिक्षणसंस्था चालकांसह पालकांचीही होताना दिसते. यामध्ये विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाकडे सर्वांचेच दुर्लक्ष होते. यातील काही घटकांना समाजाच्या अपेक्षांची जाणीव असते. मात्र, त्या कशा पूर्ण करायच्या याची माहिती नसते.

यावर उपाय शोधण्यासाठी आणि या सर्व घटकांना प्रशिक्षित करण्यासाठी सांगलीतील लुल्ला चॅरिटेबल ट्रस्टने ‘शिकू आनंदे’ हा कार्यक्रम हाती घेतला आहे. येत्या डिसेंबरपासून सांगली आणि ४० कि.मीच्या परिसरातील शंभर शाळांमध्ये हा प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येणार आहे. पुण्यातील ज्ञानप्रबोधिनी, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि एमकेसीएलच्या सहकार्यातून हा प्रशिक्षण कार्यक्रम तयार केला आहे. या उपक्रमासाठी लुल्ला ट्रस्टने शिक्षकांसह समाजातील सर्व स्तरातील घटकांना सामावून घेतले आहे. या कार्यक्रमातून काही निवडक शाळा पुढे रोटरी क्लबच्या ‘टीच’ या शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमात सहभागी करून घेतल्या जाणार आहेत.
या विषयांवर भर
>किशोरवयीनविद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व विकास
>शिक्षकांसाठी कौशल्ये क्षमता विकास
>संस्थाचालकांना नैतिक जबाबदारीची जाणीव करून देणे
>शिक्षक, संस्थाचालकांच्या अडचणी जाणून घेणे
>मुलांच्या भावनिक, बौद्धिक शारीरिक

कार्यक्रम वाढवणार
>समाजाच्याशिक्षण क्षेत्राकडून असलेल्या अपेक्षा शिक्षक, शिक्षण संस्थाचालकांपर्यंत पोहोचवणे आणि त्या पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन करणे, हा या उपक्रमामागील हेतू आहे. या कार्यक्रमाची व्याप्ती राज्यभर वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी यातून निघणारे निष्कर्ष आम्ही शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. शिवाय राज्यभरातील शाळांपर्यंत हा उपक्रम विविध माध्यमातून आम्ही पोहोचवणार आहोत. किशोरलुल्ला, लुल्लाचॅरिटेबल ट्रस्ट