आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Eight Years Old Rehan Skets 163 Km For Save Baby Girl

‘लेक वाचवा’ अभियानासाठी आठ वर्षीय रेहान करणार 163 किमी स्केटिंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा - प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ‘लेक वाचवा’ हा संदेश देण्यासाठी रेहान इम्रान मुल्ला हा आठ वर्षांचा बालक स्केटिंगच्या माध्यमातून पुणे ते कराड हे 163 किलोमीटरचे अंतर दोन दिवसांत पार करणार आहे. रेहानचे प्रशिक्षक विजय मलजी व विजय क्लबचे काही सदस्यही त्याला साथ देणार आहेत. त्यासाठी रेहानने जय्यत तयारी केली असून, दररोज सहा तास कसून सराव केला जात असल्याची माहिती प्रशिक्षक मलजी यांनी दिली. शनिवारी सकाळी सहा वाजता शनिवारवाड्यापासून हा उपक्रम सुरू होणार आहे.
* रेहानसोबत एक रुग्णवाहिका, तीन चारचाकी, चार दुचाकी व 15 सहकारी मार्गदर्शनासाठी असतील.
* रेहान उर्दू माध्यमाच्या शाळेत दुसरीच्या वर्गात शिकतो.
163 किमी अंतर कापणार
100 किमी पहिल्या द‍िवशी
63 किमी दुस-या दिवशी अंतर
15 सहका-यांची रेहानला मदत
06 दररोज रेहानचा प्रस्ताव