आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Election Commission Ban Exit Polls News In Marathi

एक्झिट पोलवर आयोगाची बंदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा - लोकसभा निवडणूक निकालपूर्व अंदाज (एक्झिट पोल) वर्तवण्यास सोमवारपासून बंदी घालण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी यांनी याबाबतचे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
सात एप्रिलपासून देशात लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पहिल्या टप्प्याला प्रारंभ झाला. त्यामुळे आयोगाने लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1951 चे कलम 126 क (2) नुसार 7 एप्रिलपासून 12 मे रोजी सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत एक्झिट पोलचे निकाल कोणत्याही वर्तमानपत्रात प्रसिद्धीस करण्यास, इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे दाखवण्यास, प्रसारण करण्यास बंदी घातली आहे.
विदर्भातील प्रचार आज संपणार
मुंबई - विदर्भातील प्रचार मंगळवारी सायंकाळी संपणार आहे. विदर्भात लोकसभेच्या 10 जागांसाठी गुरुवारी मतदान होणार आहे. त्यासाठी यंदा 201 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. यात 90 अपक्ष तर 15 महिलांचा समावेश आहे.