आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘कोल्हापूरच्या टोलचा विषय संपवा’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - विधानसभा निवडणुकी वेळी प्रचार करताना राज्य टोलमुक्त करण्याची घोषणा भाजपने केली. त्याची सुरुवात कोल्हापूरपासून करावी, अशी मागणी कोल्हापूरच्या टोलविरोधी कृती समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

निवडणूक प्रचारामध्ये भाजपच्या सर्वच नेत्यांनी टोलमुक्त महाराष्ट्राची घोषणा केली होती. त्यानुसार आता निर्णय घ्या, असे आवाहन प्रा. एन. डी. पाटील आणि समितीचे निमंत्रक निवास साळोखे यांनी मुख्यमंत्र्यांना केले आहे.