आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वज्रलेपावरुन झालेल्‍या वादात विठ्ठलाच्‍या मूर्तीचे काय?

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर: विठ्ठलाच्या मूर्तीला इपॉक्सी लेप देण्याच्या निर्णयाला तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे. 20 जानेवारीला पुरातत्त्व विभागाचे अधिकारी येऊन वज्रलेपनासाठी विठ्ठलाच्या मूर्तीची पाहणी करणार आहेत. तोपर्यंत विठ्ठलाचे दर्शन खुले करण्यात आले आहे. परंतु, वज्रलेपावरुन सुरु झालेल्‍या या वादात विठ्ठलाच्‍या मुर्तीचे काय, असाच प्रश्‍न निर्माण झाला आहे.
विठ्ठलाच्‍या मूर्तीची झीज थांबवण्यासाठी मूर्तीला इपॉक्सी लेप लावण्याचा निर्णय मंदिर समितीने दोन दिवसांपूर्वी घेतला होता. या कामाला वारक-यांनी विरोध केला आहे. वारक-यांनी मंदिराबाहेर ठिय्या आंदोलन केले. वारक-यांना वज्रलेपाची संपूर्ण माहिती देण्‍यासाठी काल बैठक बोलाविण्‍यात आली होती. परंतु, त्‍यात गोंधळ झाला. वारक-यांनी सांगितले की, आम्‍ही तज्ज्ञ नाही. ही प्रक्रीया काय आहे, हे आम्‍हाला माहिती नाही. गेल्‍या वेळेस पुरातत्त्व खात्‍याने हे काम केले होते. इपॉक्‍सी कोटींग मुळे मुर्तीची हानी होऊ शकते, असे पुरातत्त्व खात्‍याच्‍या अधिका-यांनी म्‍हटले आहे. त्‍यामुळे आमचा विरोध आहे. तुम्‍ही जे सांगत आहात, ते पुरातत्त्व खात्‍याच्‍या अधिका-यांनीही सांगितले तर आमची हरकत नाही, असे वारक-यांनी स्‍पष्‍ट केले. त्‍यानंतर आता 20 जानेवारीला पुरातत्त्व खात्‍याचे अधिकारी येऊन चर्चा करणार आहेत. या बैठकीत समितीमध्‍येही दोन मतप्रवाह आढळून आले.
पुण्याच्या डेक्कन कॉलेजचे प्रमुख गो. ब. देगलूरकर यांच्या नेतृत्त्वाखाली वज्रलेपाचे काम होणार होते. मूर्तीला इपॉक्सी लेप देण्याचं काम तूर्तास थांबवल्यामुळे वारकऱ्यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले आहे.
आदिनाथ मूर्ती संरक्षणासाठी आता केमिकलचा लेप