आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Everest Girl Priyanka Mohite Help To Satara Corporation

एव्हरेस्ट सर करणार्‍या प्रियंकाला पाच लाखांची मदत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा- ‘मी एव्हरेस्ट शिखर सर केले असले तरी माझ्या या यशात आई-वडिलांसह अनेकांचा वाटा आहे. यापुढे जगातील चौदा अवघड आणि क्रमवारीतील महत्त्वाची शिखरे मी सर करणार आहे. ल्होत्से हे माझे पुढील लक्ष्य असेल,’ अशी प्रतिक्रिया एव्हरेस्ट शिखर सर करणारी सातार्‍याची प्रियांका मोहिते हिने व्यक्त केली. एव्हरेस्टची मोहिम यशस्वी करून सातार्‍यात आलेल्या प्रियंकाचे शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. पोवई नाक्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून तिची मिरवणूक काढण्यात आली. नगराध्यक्षा सुजाता राजेमहाडिक, उपनगराध्यक्ष अमोल मोहिते सहभागी झाले होते. यावेळी नगर पालिकेच्या वतीने प्रियंकाला पाच लाख रुपयांची मदत देण्यात आली.