Home | Maharashtra | Western Maharashtra | Kolhapur | everest veer ashish mane coming in satara, maharashtra

एव्हरेस्टवीर आशिष माने सातार्‍यात

प्रतिनिधी | Update - Jun 08, 2012, 05:16 PM IST

आपला राष्ट्रध्वज जगातील सर्वोच्च शिखरावर, माउंट एव्हरेस्टवर फडकावताना अत्यंत अभिमान वाटला.

  • everest veer ashish mane coming in satara, maharashtra

    सातारा: आपला राष्ट्रध्वज जगातील सर्वोच्च शिखरावर, माउंट एव्हरेस्टवर फडकावताना अत्यंत अभिमान वाटला. ऊर अभिमानाने भरून आले. त्यानंतर काही क्षणातच प्रचंड थंडी आणि जोरदार वाहाणार्‍या वार्‍याची जाणीव झाली, असे उद्गार सातार्‍याचा एव्हरेस्टवीर आशिष माने याने काढले. एव्हरेस्ट सर केल्यावर तो प्रथमच सातार्‍यात आला असताना त्याची प्रकट मुलाखत शाहू कलामंदिरात घेण्यात आली त्या वेळी तो बोलत होता. या कार्यक्रमाला सातारकरांना मोठी उपस्थिती लावली होती. त्यापूर्वी त्याच्यासह उमेश झिरपे, भूषण हर्षे, आनंद माळी, गणेश पोरे, सचिन ढेंग, टेकराज अधिकारी, कृष्णा ढोकळे, चेतन केतकर, प्रसाद जोशी, सुरेंद्र जालेघर, अविनाश कांदेघर, अतुल चिरमुले आणि सुरेंद्र चव्हाण यांची सातार्‍यातून मिरवणूक काढण्यात आली.

Trending