आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवृत्त अभियंत्याकडे दीड काेटीची ‘माया’!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - कोकण पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त मुख्य अभियंता बाळासाहेब भाऊसाहेब पाटील यांच्या कोल्हापुरातील रूईकर काॅलनी परिसरातील बंगल्यावर लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला असता त्यांच्याकडे तब्बल दीड काेटी रुपयांहून अधिक मालमत्ता आढळून आली आहे. सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याबाबतचा तपास पूर्ण केला असून त्यानंतर शाहुपुरी पोलिस ठाण्यात पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाटील यांचे मूळ गाव सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट असून कोकण पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता या पदावरून ते निवृत्त झाले होते. ज्ञात उत्पन्नापेक्षा त्यांच्याकडे अधिक संपत्ती असल्याच्या तक्रारी आल्यानंतर एसीबी सोलापूरचे तत्कालिन सहायक पोलिस आयुक्त, उपअधिक्षक जी. एस. जवादवाड यांनी उघड चौकशी केली असता पाटील आणि कुटुंबीयांच्या नावे ज्ञात उत्पन्नाच्या स्त्रोतापेक्षा १ कोटी ५९ लाख, ७५ हजार रूपये बेहिशोबी मालमत्ता असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता येथील रूईकर काॅलनीतील पाटील यांच्या बंगल्यांवर एसीबीच्या अधिकाऱ्यांचा ताफा पोहोचला. त्यांनी सर्वांचे मोबाइल ताब्यात घेऊन बंगल्याच्या झडतीला सुरुवात केली. दिवसभर ही झडती सुरू होती.दरम्यान, पाटील, त्यांची पत्नी शुभलक्ष्मी, मुलगे उत्कर्ष व हर्षप्रतीक यांच्याविरोधात सोलापूरच्या एसीबीचे सहायक पोलिस आयुक्त, पोलिस उपअधीक्षक अरुण देवकर यांनी येथील शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
बातम्या आणखी आहेत...