आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष घाटगे यांचे निधन, सहकार क्षेत्रातील नेता हरपला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - महाराष्ट्र राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष, माजी आमदार व छत्रपती शाहू साखर कारखान्याच्या माध्यमातून सहकारातील आदर्श निर्माण केलेले विक्रमसिंह घाटगे (६७) यांचे सोमवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
कसबा बावडा येथील कागलवाडीतील राखीव स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा समरजितसिंह, सून, नातवंडे असा परिवार आहे. घाडगे यांनी स्थापन केलेल्या शाहू साखर कारखान्याने नेहमीच उसाला राज्यात सर्वोच्च दर देण्याची परंपरा कायम राखली. या सचोटीच्या कारभारावर त्यांनी विरोधकांनाही आपलेसे केले. शाहू कारखान्याला १९८० पासून राज्य व राष्ट्रीय पातळीवरील ५३ पुरस्कार मिळाले असून त्याचे श्रेय घाटगे यांच्या नेतृत्वाला जाते. शाहू दूध, कागल सहकारी बँक, शाहू शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी चौफेर कार्य केले.

१९७८ आणि १९८० मध्ये घाटगे यांनी दोन वेळा विधानसभेची निवडणूक जिंकली. चांगल्या प्रतिमेचा फायदा करून घेण्यासाठी अनेक नेत्यांनी विविध निवडणुकांमध्ये त्यांच्याशी हातमिळवणी केली. २००५ मध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत घाटगेंची राज्य साखर संघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली हाेती.