आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘उपरा’कार लक्ष्मण मानेंवर बलात्काराचा आरोप; \'सात वर्षांपासून माझ्यावर अत्याचार\'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा - शिक्षण संस्थेतील महिला कर्मचार्‍याच्या लैंगिक छळप्रकरणी ‘उपरा’कार पद्मश्री लक्ष्मण माने यांच्याविरुद्ध सोमवारी पोलिसांत अत्याचाराचा गुन्हा नोंदवण्यात आला. दरम्यान, मानेंविरुद्ध पुणे व सातार्‍यातील दोन महिलांनीही लैंगिक छळाच्या तक्रारी दिल्या आहेत. माने सध्या येथे नसल्याने त्यांच्यावर कारवाई झाली नसल्याचे पोलिस म्हणाले.

माने यांच्या शारदाबाई पवार शाळेत ही महिला कामावर आहे. 2003 पासून माने आपला लैंगिक छळ करत आहेत. आपल्या तसेच जावयाच्या घरी वारंवार बोलावून शोषण केले जात असल्याचे पीडितेने म्हटले आहे. सातारा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, माने कार्याध्यक्ष असलेल्या संस्थेत तक्रारदार महिला नोकरी करते. नोकरीत कायम करण्याचे आमिष दाखवून माने यांनी आपल्यावर 2003 पासून 2010 पर्यंत स्वतःच्या घरी, आश्रमशाळेत आणि पुणे येथे नेऊन बलात्कार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिस पथक पाठवण्यात आले असल्याचे सातारा तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्रीरंग लंघे यांनी सांगितले आहे.