आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी आमदार रवी पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - जिल्ह्यातील इंडीचे माजी अपक्ष आमदार रविकांत पाटील यांनी मंगळवारी राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला. आगामी महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश महत्त्वाचा मानला जातो. या कार्यक्रमास पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे, शहराध्यक्ष महेश गादेकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बळीराम साठे आदी उपस्थित होते. काही दिवसांपूर्वीच मुंबईत झालेल्या बैठकीत मधुकर पिचड व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाटील यांच्या पक्षप्रवेशाला संमती दर्शविली होती. रविकांत पाटील युवा मंचचे (आर. पी. ग्रुप) जिल्ह्यात लाखावर कार्यकर्ते आहेत. हा मंचही राष्ट्रवादीत विलीन करण्यात येत आहे अशी घोषणा पाटील यांनी केली. आगामी निवडणुकीत पक्षाच्या अधिकाधिक जागा निवडून आणण्यासाठी आपण प्रयत्न करू व जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्ष आणखी बळकट करू, असेही पाटील यांनी सांगितले.
सुशीला संकलेचा यांच्या काव्यसंग्रहाला संस्कृती मंडळातर्फे अनुदान
नाशिक । महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे दरवर्षी नवलेखकांसाठी पहिल्या पुस्तकाला अनुदान दिले जाते. यंदा हा मान मिळाला आहे नाशिकच्या कवयित्री सुशीला मोहनलाल संकलेचा यांना. त्यांच्या ‘अवती-भवती’ या कवितासंग्रहाची यंदा या प्रतिष्ठानकडून मिळणा-या अनुदानासाठी निवड झाली आहे. राज्यभरातून येणा-या अनेक अर्जांमधून काव्य, ललित साहित्य या प्रकारांमधील एका पुस्तकाची निवड तज्ज्ञांची समिती करते. यंदा नाशिकच्या संकलेचा यांची निवड झाल्याने त्यांचे सर्वांकडून अभिनंदन होत आहे. आजवर नाशिकच्या फक्त तीन साहित्यिकांना याचा मान मिळाला आहे. अवती-भवती हा काव्यसंग्रह याच महिन्यात प्रकाशित होणार आहे. सुशीला संकलेचा यांना यंदाच्या सावाना वार्षिक साहित्यमेळाव्यात ज्येष्ठ कवी गोविंदाग्रज स्पर्धेत तृतीय बक्षीसही मिळाले आहे.