आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूर: शेतकऱ्यासह पत्रकाराचा गव्याच्या हल्ल्यात मृत्यू; चित्रीकरण करताना पत्रकारावर हल्ला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- गव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्यासह एका पत्रकाराचा मृत्यू झाल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यातील आकुर्डे येथे शुक्रवारी घडली. शेतकरी अनिल पोवार आणि पत्रकार रघुनाथ शिंदे अशी मृतांची नावे आहेत.  
    
सकाळी उसाचा पाला काढण्यासाठी पोवारसह इतर दोन जण शेतात गेले होते. या वेळी गवा हा उसात लपून बसला होता. पोवार हे उसाचा पाला काढण्यासाठी गेले असता त्यांच्यावर लपून बसलेल्या गव्याने हल्ला चढवला. पोटात शिंगे घुसून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर पोवार यांचे साथीदार घटनास्थळाहून पळाल्याने बचावले.   

चित्रीकरण करताना पत्रकारावर हल्ला  
गव्याने हल्ला केल्याचे वृत्त कळताच स्थानिक वृत्तवाहिनीचे पत्रकार  रघुनाथ शिंदे घटनास्थळी दाखल झाले. शिंदे हे चित्रीकरण करत असताना गव्याने त्यांना पाठीमागून धडक देत १२ फुटांवर भिरकावले. शिंदे यांच्या पोटातही शिंग घुसल्याने मोठा रक्तस्राव झाला. यानंतर त्यांना उपचारासाठी कोल्हापूर येथे हलवण्यात आले.  मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
बातम्या आणखी आहेत...