आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूरात कर्जबाजारी शेतकरी विलास सितापेची गळफास घेऊन आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - विलास यशवंत सितापे वय 45  रा.कोडोली ता.पन्हाळा या शेतकऱ्याने बँक ऑफ इंडियाच्या कर्ज वसुलीच्या तगाद्या ला कंटाळून आज सकाळी 6 वाजता राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
 
विलास सितापे या शेतकऱ्याने दोन गायी घेण्यासाठी बँक ऑफ इंडियाच्या कोडोली शाखेकडून 1 लाखाचे कर्ज घेतले होते. या कर्जाचे व्याजासहित 5000 रुपयांचे हप्ते थकीत होते. गेल्या काही दिवसांपासून बँकेने या कर्जाच्या वसुलीसाठी सितापे यांच्याकडे वारंवार तगादा लावला होता. तसेच दैनिकात शेतकऱ्याच्या नाव व छायाचित्रासह जाहिरात सुद्धा लावली.
 
शेकापच्या सभेच्या दुसऱ्याच दिवशी आत्महत्या
विशेष म्हणजे, खासदार राजू शेट्टी यांनी याच कोडोली गावात बुधवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सभा घेतली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. व्यथित झालेल्या खा.राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये. आलेल्या प्रसंगाला धीराने तोंड द्यावे असे आवाहन केले आहे.तसेच शेतकऱयांनी अशा पद्धतीने आत्महत्या करू नयेत म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटना विशेष मोहीम राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...