आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱयावर लादलेली प्रस्तावित वीज दरवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी महावितरण कार्यलयावर मोर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - राज्य सरकारच्या अनागोंदीमुळे शेतीसाठी दिल्या जाणाऱ्या विजेच्या आकारणीत अन्यायी दरवाढ करण्याचा विचार महावितरण कंपनीने केला आहे. ही अन्यायी दरवाढ मान्य नसल्याने शेतकऱयांनी आज हा मोर्चा काढला. या मोर्चाचे नेतृत्व काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री आणि विद्यमान विधानपरिषद आमदार सतेज पाटील यांनी केले. यावेळी महावितरणचे मुख्य अभियंता एम.जी.शिंदे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. संपूर्ण जिल्ह्यातून शेतकरी सहभागी झाले होते. या मोर्चात शेतकऱ्यांनी काही मागण्या केल्या आहेत. 
 
यावेळी वीज महावितरण कडे करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या अशा- 
- 2019 पर्यंत शेतकऱ्यांसाठी प्रस्तावित केलेले हे दर दुप्पट होणार आहेत ही दरवाढ तात्काळ मागे घेण्यात यावी.
-जिल्ह्यातील शेतकऱयांना मागणीनुसार शेतीपंप तत्काळ देण्यात यावेत.
- शेतीसाठी सलग 12 तास वीजपुरवठा करावा.
या  अशा मागण्यांचे निवेदन शेतकऱ्यांनी मोर्चाच्या माध्यमातून महावितरण विभागाकडे यावेळी देण्यात आले.
 
बातम्या आणखी आहेत...