आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉल्बीला परवानगी देण्याची मागणी; कोल्हापुरात आमदार क्षीरसागर यांचे उपोषण सुरू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- सर्वोच्च न्यायलयाच्या नियमानुसार साउंड सिस्टीमला परवानगी मिळावी, या मागणीसाठी आमदार राजेश क्षीरसागर यांनी आता उपोषणाचे अस्त्र उपसले आहे. छत्रपती शिवाजी चौकात आज हजारो कार्यकर्त्यांनी सकाळी 11 ते 5 या वेळेत त्यांच्यासोबत उपोषण करून त्यांच्या या भूमिकेला पाठिंबा दिला. 

यावेळी पोलिस प्रशासनाने घेतलेल्या भूमिकेचा आगामी विधानसभा अधिवेशनात आपण जाब विचारू, असे राजेश क्षीरसागर यांनी सांगितले. त्याचबरोबर शहरातील नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, अशीच कोल्हापूर शहरातील गणेश मंडळांची भूमिका असल्याचे सांगत पोलिस प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार डॉल्बीला परवानगी द्यावी अशी विनंती त्यांनी केली आहे.
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो
बातम्या आणखी आहेत...