आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fatal Bus Accident Near Kolhapur Killed 3 Passengers

PHOTOS: कोल्हापूरमध्ये दोन खासगी बसचा भीषण अपघात, 3 ठार 20 गंभीर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- पुणे-बंगळूर महामार्गावर असलेल्या किणी टोलनाक्याजवळ दोन खासगी बसची जोरदार धडक झाल्याने तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून 20 गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये हंडगल कुटुंबीयांचा समावेश आहे.
आशाभी हंडगल (वय 70), शाहीन महंमद हंडगल (वय 15) आणि शाहिदा हंडगल (वय 20) अशी मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांची नावे आहेत. किणी टोलनाक्याच्या अलीकडे एक खासगी बस उभी होती. धारवड येथून लग्नाच्या वऱ्हाडाला घेऊन ही बस आली होती. पुढे ती पुण्याला जाणार होती. यावेळी मागून आलेल्या एका भरधाव व्होल्व्हो बसने या बसला समोरुन जबर धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता, की दोन्ही बसचे मोठे नुकसान झाले. यात तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर 20 गंभीर जखमी झाले. जखमींना सी. पी. आर. या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघाताचे वृत्त समजल्यावर स्थानिक लोकांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. अन्यथा मृतांचा आकडा आणखी वाढला असता.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, घटनास्थळाचे फोटो... अपघातग्रस्त व्होल्व्हो बस....