आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साता-यात वादाला कंटाळून दोन मुलांना ठार करून वडिलांची आत्महत्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा - पत्नीशी सतत होणा-या वादाला कंटाळून पतीने दोन मुलांना विहिरीत फेकून स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सातारा येथे उघडकीस आली. लक्ष्मण जाधव (35), अभिषेक लक्ष्मण जाधव (11) आणि ओंकार लक्ष्मण जाधव (7) अशी मृतांची नावे आहेत.


लक्ष्मण यांचा नंदा यांच्याशी काही वर्षांपूर्वी विवाह झाला. लग्नानंतर त्यांना दोन मुले झाली. त्यानंतर मात्र दोघांत कायम भांडणे होत असत. त्यामुळे नंदा यांनी लक्ष्मणविरोधात पोलिसांत तक्रार दिली होती. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित होते. सुनावणीच्या दिवशी लक्ष्मण दोन्ही मुलांना घेऊन साता-याकडे निघाला होता. मात्र, पाटण येथे आल्यानंतर त्याने मुलांना एका विहिरीत फेकून देऊन स्वत: एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.