Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | father kill girl in solapur

रागाच्या भरात बापाने चिमुकलीला विहिरीत फेकले

प्रतिनिधी | Update - Feb 28, 2012, 03:47 PM IST

रागाच्या भरात पतीने आपल्या अठरा महिन्यांच्या मुलीला विहिरीत फेकून दिल्याची खळबळजनक घटना नुकतीच सोलापूर जिल्ह्यातील वाढेगाव (ता. सांगोला) येथे घडली.

  • father kill girl in solapur

    सोलापूर - घरगुती कारणावरून पती- पत्नीमध्ये भांडण झाल्यान, रागाच्या भरात पतीने आपल्या अठरा महिन्यांच्या मुलीला विहिरीत फेकून दिल्याची खळबळजनक घटना नुकतीच सोलापूर जिल्ह्यातील वाढेगाव (ता. सांगोला) येथे घडली. मारुती तुकाराम हजारे असे या काळीज नसलेल्या बापाचे नाव आहे. मारुती हा ऊसतोड कामगार आहे. पत्नी अनिता सोबत त्याचे शनिवारी कडाक्याचे भांडण झाले. या वादामुळे रागाच्या भरात मारुतीने चक्क आपल्या अठरा महिन्याच्या मुलीला घरातून उचलले व विहिरीत फेकून देऊन फरार झाला. सदर मुलीचा मृत्यू झाला असून आरोपी मारुतीविरुद्ध सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Trending