आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूर:पत्नीच्या वर्षश्राद्धदिनीच मुलासह पतीची आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - पत्नीचा विरह सहन न झाल्याने तिच्या वर्षश्राद्धाच्या दिवशीच पतीने अापल्या तरुण मुलासह आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील वळीवडे गावात गुरुवारी घडली.

पौराेहित्य करणारे मोहन भालचंद्र चरेगावकर (५१) व विनायक (२१) हे पिता-पुत्र वळीवडे येथे वास्तव्यास होते. वर्षभरापूर्वी मोहन यांच्या पत्नी वंदना यांचे आजाराने निधन झाले. तेव्हापासून मोहन खूपच खचले हाेते. ते फारसे काेणाशी बाेलतही नव्हते. अाईच्या शाेकात बुडालेल्या विनायकनेही आपले शिक्षण थांबवले होते. मात्र, पत्नीच्या, आईच्या वर्षश्राद्धदिनीच या दोघांनीही घरात गळफास घेऊन अात्महत्या केली.

वास्तविक चरेगावकर यांनी पत्नीच्या वर्षश्राद्धानिमित्त गुरुवारी नृसिंहवाडी येथे विधीचे आयोजन केले होते. त्यासाठी आपल्या आई प्रभावती यांना बहिणीकडे पाठवून दिले होते. काही पाहुणे नृसिंहवाडीत दाखलही झाले होते, तर काही जण येत होते. मात्र, दुपार झाली तरी या पिता-पुत्राचा पत्ता नसल्याने पाहुण्यांनी वळीवडे येथे फोन करून शेजाऱ्यांकडे विचारणा केली तेव्हा शेजाऱ्यांनी घरात जाऊन डाेकावले असता या दोघांनी गळफास घेतल्याचे उघडकीस आले. यानंतर वर्षश्राद्धाला आलेले पाहुणे वळीवडे येथे आले व रात्री उशिरा या दोघा पिता-पुत्रावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

‘विरह असह्य झाल्याने अाम्ही जीवन संपवत आहोत,’ असे अात्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चिठ्ठीत लिहून ठेवले होते. मोहन हे आपल्यानंतर आपल्या मुलाचे कसे होणार या विवंचनेत होते. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलालाही आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केले असावे, असा संशय व्यक्त होत आहे.

मुलाने साेडले शिक्षण
विनायक इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकत हाेता. मात्र, वडील एकलकोंडे होत असल्याचे पाहून शिक्षण साेडून ताे वडिलांसमवेत राहत होता. मोहन यांना पत्नीचा असह्य झालेला विरह आणि विनायकची कोंडी यातूनच या दोघांनी टाेकाचा मार्ग पत्कारला असावा.
बातम्या आणखी आहेत...