आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापुरातील टोलनाका पुन्हा फोडला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - येथील कळंबा नाक्यावरील टोलनाका संतप्त जमावाने शनिवारी फोडला. नाक्यावरील कर्मचाऱ्यांच्या अरेरावीमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी टोल बूथ उलटवून टाकला.
सकाळी या नाक्यावरून ग्रामीण भागातील एक कुटुंब नवी गाडी घेऊन गावाकडे निघाले होते. गाडीवर नंबरही नव्हता. या वेळी टोल नाक्यावर टोलची रक्कम मागितल्यानंतर गाडी मालकांनी नकार दिला. यानंतर कर्मचारी व गाडी मालकात शाब्दिक चकमक उडाली. दरम्यान, गाडी मागे घेतली जात असताना कर्मचाऱ्यांनी पाठीमागे लावलेले बॅरिकेड्स गाडीला घासले. यावरून वादावादी पुन्हा वाढली व जमा झालेल्या ग्रामस्थांनी टोल नाका उलथवून टाकला. तातडीने पोलिस घटनास्थळी आले, मात्र ग्रामस्थांपुढे त्यांचेही काही चालले नाही.