आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाचखोरीप्रकरणी नाही नाही म्हणत अखेर राजीनाम्यास कोल्हापूरच्या महापौर तयार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - लाचखोरीप्रकरणी पक्षाने राजीनामा घेतल्यानंतरही महापालिकेत राजीनामा देण्यास कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवी यांनी सोमवारी नकार दिला. मात्र, वरिष्ठ नेत्यांनी दबाव आणल्याने काही वेळातच त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय मान्य केला. १६ फेब्रुवारीच्या महासभेत आपण राजीनामा देणार असल्याचे माळवी यांनी सोमवारी जाहीर केले.
माळवी यांची ८ फेब्रुवारीला मुदत संपत होती. त्यानंतर काँग्रेसकडे हे पद जाणार आहे. अशातच ३० जानेवारीला माळवी यांन १६ हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले. त्यानंतर त्यांना अटक व जामिनावर सुटकाही झाली. यादरम्यान त्यांना राजीनामा देण्याबाबत पक्षाने सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सोमवारी महापालिकेची महासभा झाली, परंतु ‘माझी मानसिकता नाही,’ असे सांगत माळवी यांनी राजीनाम्यास नकार दिला. त्यामुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली. यानंतर तातडीने राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी माळवी यांना कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल, असे सुनावले.