Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | fire cracker factory blast kills 4 women labors

पंढरपुरजवळ फटाका फॅक्‍टरीत स्‍फोट; 5 महिला ठार,9 जण जखमी

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Feb 20, 2012, 06:59 PM IST

भाळवणी (ता. मंगळवेढा) येथील फटाका कारखान्यात फटाके उन्हात वाळण्यासाठी ठेवले असताना उष्णतेमुळे झालेल्या स्फोटात पाच महिला कामगार जागीच ठार झाल्या

  • fire cracker factory blast kills 4 women labors

    सोलापूर - भाळवणी (ता. मंगळवेढा) येथील फटाका कारखान्यात फटाके उन्हात वाळण्यासाठी ठेवले असताना उष्णतेमुळे झालेल्या स्फोटात पाच महिला कामगार जागीच ठार झाल्या, तर नऊ जण गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली. या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनेस्थळी पोहोचल्या आहेत.
    भाळवणी येथे सागर फायर वर्क्स हा फटाके तयार करण्याचा कारखाना आहे. सोमवारी फटाके तयार करून कामगारांनी ते वाळत घातले होते. कडक उन्हामुळे या फटाक्यांचा भीषण स्फोट झाला. त्यात कारखान्यात काम करत असलेल्या 25 कामगारांपैकी पाच महिला जागीच ठार झाल्या, तर इतर 9 जण गंभीर जखमी झाले. त्यामुळे या घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परिसरातील नागरिकांनी घटनेची माहिती तातडीने पोलिस व अग्निशामक दलाला दिली. या घटनेतील जखमींना मंगळवेढा आणि सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मृतांची ओळख उशिरापर्यंत पटली नव्हती.Trending