आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापुरात शाहूपुरी परिसरात प्रिंटिंग प्रेसला आग; 5 लाखावर नुकसान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
कोल्हापूर- येथील शाहूपुरी मधील पांच बंगला परिसरातील मालती मुद्रणालय या प्रिंटिंग प्रेसला आज सायंकाळी 7.15 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत सुमारे 5 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी मात्र झालेली नाही. आग लागण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही, असे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
 
दिवाळी पाडव्यानिमित्त प्रेस आज बंद होती.सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास अचानक या प्रेस मधून धुराचे लोट आल्याने परिसरातील नागरिकांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला या आगीची वर्दी दिली. त्यानंतर तात्काळ घटनास्थळी दाखल झालेल्या 4 अग्निशमन दलाच्या वाहनांनी 3 अधिकारी आणि 25 जवानांच्या तब्बल पाऊण तासाच्या अथक परिश्रमानंतर ही आग आटोक्यात आली.या आगीत मुद्रणालयाच्या बाजूचे दुचाकी दुरुस्तीचे गॅरेजही जळून खाक झाले आहे, अशी माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख चिले यांनी दिली. घटनास्थळावरील पंचनामा करण्यात आला आहे असेही ते म्हणाले.
 
पुढील स्लाईडवर पाहा घटनेचा व्हिडिओ
बातम्या आणखी आहेत...