आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • First Attempt Of E Voting In Sangli Municipal Corporation Election

ई-व्होटिंगचा पहिला प्रयोग सांगली मनपा निवडणुकीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली- ई-व्होटिंगचा राज्यात प्रथम प्रयोग सांगली-मिरज-कूपवाड महापालिकेच्या निवडणुकीत करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. हा प्रयोग प्रायोगिक तत्त्वावर असल्याने यंदा फक्त पोलिस, निवडणूक कर्मचारी, पोलिंग एजंट, पत्रकार यांच्यासाठीच सुविधा राहणार आहे.

पत्रकारांशी बोलताना सत्यनारायण म्हणाल्या, ‘खरे तर आम्ही मुंबई महापालिका निवडणुकीतच ई-व्होटिंगचा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्याच्या सुरक्षिततेबाबत समाधानकारक उत्तर मिळाले नव्हते. त्यामुळे हा प्रयोग केला नाही. आता सांगली महापालिकेच्या निवडणुकीत पोलिस, निवडणूक कर्मचारी, पोलिंग एजंट, पत्रकार यांच्यासाठी हा प्रयोग आम्ही राबवणार आहोत. सर्वसामान्य मतदारांना तूर्त तरी त्याचा लाभ मिळणार नाही.

पुढे काय?
ई-व्होटिंग करू इच्छिणा-यांना आधी जिल्हाधिकारी किंवा महापालिका आयुक्तांकडे नाव नोंदणी करावी लागेल.
त्यांच्या नावाची मतदार यादीत नोंद होईल.
नोंदणीनंतर कुठूनही मतदान करता येईल.
एकदा ई-व्होटिंग केल्यास पुन्हा केंद्रावर जाऊन मतदान करता येणार नाही.

दहा टक्के मतदान वाढेल
‘ठरावीक लोकांसाठीच सध्या ई-व्होटिंग पद्धत लागू केल्यास दहा टक्के मतदान वाढेल, अशी आशा आहे. सांगलीत हा प्रयोग यशस्वी झाल्यावर पुढे जाऊन त्याची व्याप्ती वाढवण्याचा आमचा संकल्प आहे.’
नीला सत्यनारायण, आयुक्त, निवडणूक आयोग