आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शोभेच्या दारूचा स्फोट होऊन पाच ठार, चार जखमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली - शोभेची दारू बनवताना स्फोट होऊन पाच ठार, तर चौघे जखमी झाले. ही घटना सांगली जिल्ह्यातील कवठेएकंद येथे रविवारी सायंकाळी घडली.दीपक मळणगावे (9), मोहन ईश्वरा मळणगावे (55), वसंत मळणगावे (८0), चेतन मिलिंद मळणगावे (14) आणि शोभा बापुराव निरंजणे (5८) अशी मृतांची नावे आहेत. कवठेएकंद येथे दस-याच्या दिवशी रात्रभर शोभेच्या दारूची आतषबाजी केली जाते.

रविवारी आकाशतारा दारू शोभा मंडळाचे कार्यकर्ते मोहन मळणगावे यांच्या घरासमोर शोभेच्या दारूचे साहित्य तयार करत होते. संध्याकाळी एक अग्निबाण मळणगावे यांच्या घरासमोरील दारूसाठ्यात पडून त्याचा स्फोट झाला. त्यामुळे दुकानाचे शटर व जवळच असलेली मोटारसायकलही दूरवर फेकली गेली. दरम्यान, गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी तत्काळ रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.