आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सह्याद्री’त ५ वाघांची डरकाळी, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या पाहणीत नोंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पाच वाघ असल्याचे जाहीर केले. सातारा जिल्ह्यातील कोयना अभयारण्य, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांमध्ये विस्तारलेल्या चांदोली राष्ट्रीय उद्यानाचे मिळून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला २००८ मध्ये मान्यता मिळाली. सदाहरीत जंगलामुळे येथे २०१० नंतर वाघाचे दर्शनच झाले नव्हते; त्यामुळे अनेकदा व्याघ्र प्रकल्प असूनही येथे वाघच नसल्याचा संशय व्यक्त केला होता. २०१४ च्या एप्रिलमध्ये वनाधिकारी एस.एल.झुरे यांना चांदोलीत प्रत्यक्ष वाघ दिसला होता. त्यामुळे संपूर्ण व्याघ्र प्रकल्पात ५० रिमोट सेंसिंग कॅमेरे बसवण्यात आले होते. त्यामध्ये झालेल्या नोंदींनुसार व्याघ्र प्रकल्पात ५ वाघ असल्याचे ‘एनटीसीए’ने स्पष्ट केले आहे.
कर्नाटकात मारला गेला एक वाघ
कर्नाटकातील बेळगाव शहरात गेल्या महिन्यात वाघ शिरला होता. त्याने एका महिलेलाही ठार केले होते. त्यामुळे दिसताश्रणी गोळ्या घालण्याचे आदेश कर्नाटकच्या वन विभागाने दिले होते. त्यात हा वाघ मारला गेला होता. सह्याद्रीतील पाचपैकीच हा एक वाघ होता. त्याचे वास्तव्य हे सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या सीमेवरील तिलारीच्या जंगलात अनेकदा झाले होते.