आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नृसिंह वाडीतील दत्त मंदिर कृष्णा-पंचगंगेच्या पाण्यात; गगनबावडा, राधानगरीत अतिवृष्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील कृष्णा-पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने येथील दत्त मंदिर पुराच्या पाण्यात गेले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात अद्याप पावसाचा जोर कायम असून जिल्ह्यातील एकूण 75 बंधारे पुराच्या पाण्याखाली गेले आहेत.

जिल्ह्यातील काही प्रमुख राज्य मार्ग आणि जिल्हा मार्ग वाहतुकीसाठी बंद आहेत. या ठिकाणची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. गगनबावडा आणि राधानगरी तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने नद्यांनाल्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.

गेल्या 24 तासात जिल्ह्यात एकूण 907.74 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 12 तालुक्यात गेल्या 24 तासात पडलेला मिलिमीटर मधील पाऊस खालील प्रमाणे आहे. हातकणंगले 30.77 मिमी., शिरोळ 34.28, पन्हाळा 63.71, शाहूवाडी 72.83, राधानगरी 115.33, गगनबावडा 136.50, करवीर 48.9, कागल 83.28, गडहिंग्लज 45.71, भुदरगड 65.80, आजरा 96.00, चंदगड 115.66 पावसाची नोंद झाली आहे.
बातम्या आणखी आहेत...