आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खंबाटकी घाटात महापुराची परिस्थिती; व्हिडिओत पाहा वाहन चालकांचा कसा उडाला थरकाप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा- मुसळधार पावसामुळे पुणे-बंगळुरु महामार्गावरील खंबाटकी घाटात महापुराची परिस्थिती निर्माण झाली होती. पूरपरिस्थिती एवढी भीषण होती, की वाहन चालकांचा थरकाप उडाला होता.
 
वाहतूक ठप्प झाली होती ठप्प
खंबाटकी घाट परिसरात संध्याकाळी जोरदार पाऊस झाल्याने पावसाचे पाणी घाटवळणावरुन रस्त्यावर आल्याने काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती. या रौद्ररूप धारण केलेल्या प्रवाहाकडे पाहताना प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकत होता.
 
रुंदीकरणाचे काम आहे सुरु 
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 चे पुणे ते सातारा दरम्यान सहापदरीकरण करुन रुंदीकरणाचे काम सुरु आहे. या कामादरम्यान पावसाच्या पाण्याला वाट करुन देण्यासाठी तात्पुरती मोरी तयार करण्यात आली आहे.  खंबाटकी घाट परिसरात दुपारनंतर झालेल्या पावसानंतर या मोरीतून पाणी रस्त्यावर आले होते. सोबत माती आणि राडरोडाही होता. पाण्याच्या मोठ्या प्रवाहामुळे दरड कोसळली असावी असे वाटत होते. परंतु तसा प्रकार नव्हता. वरच्या भागातील पाण्याला वाहून जाण्यासाठी केलेली ही सोय होती. 
बातम्या आणखी आहेत...