आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूर शहराला पुराचा वेढा; जिल्ह्यातील 69 बंधारे अजूनही पाण्याखाली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- धरणांतून साेडलेल्या पाण्यामुळे कोल्हापूर शहराच्या दोन्ही बाजूंना पंचगंगा नदीचे पाणी पसरले अाहे, त्यामुळे शहराला जणू पुराचा वेढाच पडल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत बचाव कार्यासाठी राष्ट्रीय आपत्कालीन पथक शहरात दाखल झाले अाहे. पंचगंगा अजूनही धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्याने प्रशासनाला सज्जतेचे आदेश देण्यात आले आहेत. अजूनही जिल्ह्यातील ६९ बंधारे पाण्याखाली असून अनेक गावांची वाहतूक थांबवण्यात आली आहे.

कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील ब्रिटिशकालीन शिवाजी पूलही पुरामुळे दोन दिवस वाहतूकीस बंद ठेवावा लागला, त्यामुळे प्रवाशांची गैरसाेय झाली. रविवारी कळंबा, रंकाळा, सुतारगल्ली, कुंभार गल्ली, राजाराम बंधारा आदी ठिकाणांच्या पूरस्थितीची जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी पाहणी केली. त्यांच्यासमवेत महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, एनडीआरएफ पथकाचे प्रमुख असिस्टंट कमांडंट पी. वैरवनाथन, निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बर्गे अादी होते.
शहरातील सुतार गल्ली आणि कुंभार गल्लीत पाणी शिरले असून या परिसराचीही जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली. तसेच या परिसरातील नागरिकांशी चर्चा केली. पूरग्रस्तांंना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याबाबतच्या उपाययोजनांची माहिती त्यांनी घेतली. त्यानंतर राजाराम बंधाऱ्याची पाहणी केली.
बातम्या आणखी आहेत...