आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी आमदार पी.बी. पाटील कालवश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली - नवे गाव आंदोलनाचे प्रवर्तक, माजी आमदार प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील (83) यांचे रविवारी पहाटे दीर्घ आजाराने सांगलीत निधन झाले. महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या स्वप्नातील ग्राम स्वराज्याची कल्पना सत्यात उतरवण्यासाठी डॉ. पाटील यांनी नवे गाव आंदोलन सुरू केले. 1958 मध्ये त्यांनी नवभारत शिक्षण मंडळाची स्थापना केली. या संस्थेचे सांगलीतील शांतिनिकेतन लोकविद्यापीठ हे विद्यार्थ्यांना सांस्कृतिक मूल्यांची जपणूक करत शिक्षण देणारे केंद्र बनले.

राष्ट्रसेवा दलाचे सक्रिय कार्यकर्ते राहिलेले डॉ. पाटील 1972 मध्ये सांगली विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. 1972 ते 78 या काळात त्यांनी काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी म्हणून, तर 1972 ते 90 असे दीर्घकाळ अखिल भारतीय काँग्रेसचे सदस्य म्हणून काम केले. शासनाने स्थापन केलेल्या पंचायत राज मूल्यमापन समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी कामाचा ठसा उमटवला. पाटील यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.