आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Four People Died Due To Electricity Shock In Belgaum

बेळगावातील मिरवणुकीत विजेच्या धक्क्याने चौघांचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर - बेळगाव येथील गणेश विसर्जन मिरवणुकीत विजेच्या धक्क्याने चौघांचा मृत्यू झाला. यामध्ये एक महिला आणि दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यामुळे वातावरण शोकाकुल झाले असून त्याचे सावट मिरवणुकीवर होते.


बेळगावमधील सदाशिवनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा 32 फुटी गणेशमूर्ती बसवली होती. पुठ्ठ्यांपासून तयार केलेल्या या मूर्तीमध्ये लोखंडी पट्ट्यांचा वापर करण्यात आला होता. या मूर्तीचे शहरात खूप कौतुक
झाले होते. बुधवारी विसर्जन मिरवणूक सुरू झाल्यानंतर ट्रॅक्टरवरील मूर्तीचा स्पर्श विजेच्या तारांना झाला. त्यामुळे ट्रॅक्टरवर बसलेल्या अनेक कार्यकर्त्यांना विजेचा धक्का बसला. गणेश मूर्तीजवळ बसलेले दोन विद्यार्थी जागीच ठार झाले. तसेच ट्रॅक्टरला स्पर्धा झालेली एक महिला आणि पुरुषाचाही यामध्ये मृत्यू झाला.


नगर, नाशिकमध्ये सहा जण बुडाले
दोन वेगवेगळ्या घटनांत नाशिक जिल्ह्यात चौघांचा मृत्यू झाला. टाकळी विंचूर येथील वैभव पंडित शिंदे (16) आणि सागर जनार्दन बच्छाव (19) हे गणपती विसर्जनासाठी वायेगाव बंधारा येथे गेले असता त्यांचा बुडून मृत्यू झाला. निमगाव वाकडा निफाड येथील विजय सकाराम आहिरे (35) यांचा ओहळात बुडून तर मासे पकडण्यासाठी गेलेल्या भावली खुर्द येथील गोविंद कोंडाजी आगीवाले यांचाही बुडून मृत्यू झाला.


कोपरगाव व राहाता येथेही बुधवारी विसर्जनासाठी गेलेल्या ओमप्रकाश राधेश्याम अग्रवाल (40, आदर्श चौक, कोपरगाव) व विलास काशीनाथ कदम (19, गोंडगाव, राहाता) यांचा बुडून मृत्यू झाला. गोंडगाव येथील विलास कदम हे राहाता येथील बंधा-यात विसर्जनासाठी गेले असता बुडाले. त्यांचा मृतदेह रात्री उशिरा नदीपात्रात सापडला.