आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजेंद्र तुपारे अमर रहे...मुलगा आर्यनने दिला मुखाग्नी, अखेरच्या निरोपासाठी लोटली पंचक्रोशी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- जम्मू-काश्मीरच्या शोपिया भागात पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात वीरमरण आलेल्या राजेंद्र तुपारे यांच्या पार्थिवावर त्याच्या मूळगावी कार्वे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा आर्यन यानेे वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. मनाला चटका लावणारी गोष्ट म्हणजे, आर्यन याचा आज (8 नोव्हेंबर) वाढदिवस आहे. दुर्भाग्याची गोष्ट म्हणजे वाढदिवशीच वडिलांच्या चितेला अग्नी देण्याची वेळ त्याच्यावर आली आहे. ‘अमर रहे, अमर रहे, राजेंद्र तुपारे अमर रहे’, भारत माता की जय यासारख्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

राज्य सरकारतर्फे 15 लाखांची मदत....
शहीद राजेंद्र तुपारे यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने 15 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. लवकरच ही रक्कम तुपारे यांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचवण्यात येेणार असल्याचे सूत्रांनी सांंगितले आहे.
शहीद जवान राजेंद्र तुपारे यांचे पार्थिव सकाळी कार्वे गावात पोहोचले होते. कार्वे गावासह संपूर्ण कोल्हापूर जिल्हा शोकमग्न झाला आहे. वीरपूत्राला अखेरच्या सलामीसाठी पंचक्रोशी लोटली होती. तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार संध्यादेवी कुपेकर, आमदार अमल महाडिक, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे उपस्थित आहेत. तुपारे शहीद झाल्याचे समजताच अवघ्या कोल्हापूर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
विमानतळावर मानवंंदना...
राजेंद्र तुपारे यांचे पार्थिव बेळगावातून त्यांच्या मूळगावी चंदगडच्या कार्वे गावात आणण्यात येईल. सोमवारी रात्री त्यांचे पार्थिव बेळगावात ठेवण्यात आले. विमानतळावर राजेंद्र तुपारेंना मानवंदना देण्यात आली.
2002 मध्ये लष्करात झाले होते रुजू...
तुपारे हे 2002 मध्ये बेळगावमधील मराठा लाईट इन्फन्ट्रीमध्ये रुजू झाले होते. पुंछमध्ये सीमेवर ते तैनात होते. शोपियांमध्ये लष्कर-पोलिस आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. वनगाम परिसरात भीषण फायरिंग झाली होती. 62RR आणि पोलिस जवानांनी दहशतवाद्यांना घेरले होते. एक दहशतवादीही यात मारला गेला.

तुपारे यांच्या पश्चाात पत्नी, दोन मुले आर्यन (9 वर्षे) आणि वैभव (5 वर्षे) तसेच आई-वडील आहेत.
तुपारे यांच्यासोबत गुरुसेवक सिंह या जवानालाही वीरमरण आले होते. काही दिवसांपूर्वीच गुरुसेवक याचे लग्न ठरले होते. दोन महिन्यांनंतर म्हणजे 13 फेब्रुवारीला त्याचे लग्न होणार होते.

पुढील स्लाइडवर पाहा, तुपारे यांचे कुटुंबाबरोबरचे आणि इतर काही PHOTOS..

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत अवर्षे तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत अवर्षे तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...