आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवप्रेमींच्या उपस्थितीत गडकोट मोहिमेची सांगता

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा: शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 27 व्या गडकोट मोहिमेची सांगता सातारा येथे रविवारी करण्यात आली. 11 जानेवारीपासून कराड येथे या मोहिमेची सुरुवात करण्यात आली होती. या वेळी छत्रपती उदयनराजे भोसले, इतिहासतज्ज्ञ निनाद बेडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
सा-या जगाला विचारले की तुमचा बाप कोण ? तर उत्तर मिळेल हिंदुस्थान. संपूर्ण देशात आज खरी गरज आहे ती नेतृत्व करणा-या महाराष्ट्रासारख्या राज्याची आणि आपल्याला ही परंपरा लाभली आहे छत्रपती शिवरायांकडून. अशा या थोर महापुरुषाच्या विचारांचा वारसा घेऊन आता राष्ट्रकारणात हिंदवी स्वराज्य महत्त्वाचे आहे. यासाठी राजे, तुम्ही आता पाठबळ आम्हाला द्या, या शब्दांत शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी साता-यात थेट छत्रपती शिवरायांचा वारसा लाभलेले खासदार आणि शिवरायांचे 13 वे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांना विनंती केली. यावर बोलताना उदयनराजे यांनी सांगितले की, मला तुमचे प्रेम असेच मिळू द्या. माझ्या मनात तुमच्याविषयी आदर आहेच. आमचे सहकार्य नेहमी तुम्हाला असेल. या वेळी सातारा परिसरातून तसेच आजूबाजूच्या भागातून 20 हजार शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.