आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साता-यात सामूहिक बलात्कार; तिघांना अटक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा - गोडोली (ता. सातारा) येथील एका महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना रविवारी रात्री घडली. याप्रकरणी तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी एक जण अल्पवयीन आहे. विशेष म्हणजे आरोपींमध्ये पिता- पुत्राचा समावेश आहे.

रविवारी रात्री मिलिंद ढमरे (43), संतोष मस्के (34) तसेच एक अल्पवयीन मुलाने एका महिलेला गोडोली भागातून एका वाहनात घालून महामार्गावर नेले. खिडवाडी परिसरात असलेल्या एका महाविद्यालयाच्या परिसरात या तिघांनी सदर महिलेवर अतिप्रसंग केल्यानंतर तिला तेथेच सोडून पलायन केले. रात्रीची वेळ असल्याने ती कशीबशी महामागापर्यंत पोहोचली.

काही लोकांच्या मदतीने तिला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना पोलिसांनी तिचा जबाब नोंदवला असून वरील तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने हालचाली करत आरोपींना ताब्यात घेतले.