सांगली - शहरातील वारणाली परिसरातील संदीप अपार्टमेंटमध्ये राहणारे पोलिस हवालदार विठ्ठल चव्हाण यांच्या घरात गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन त्यांच्या कुटुंबातील सहा जण ठार झाले. ही घटना रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. घटनेच्या वेळी चव्हाण हे ड्यूटीवर होते. त्यांच्या घरी उन्हाळ्याच्या सुटीसाठी पाहुणे आले होते. रात्रीच्या वेळी त्यांच्या घरातील गॅस सिलिंडरला अचानक गळती लागली आणि काही कळायच्या आत अचानक त्याचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की त्यात चव्हाण यांच्या दोन मुलांसह सहा जण जागीच ठार झाले. मृतांमध्ये अन्य कोण नातेवाईक आहेत, याचा तपशील मिळू शकला नाही.