आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वरिष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा कोल्हापुरात निषेध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वरिष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येचा कोल्हापूरात निषेध करण्यात आला. - Divya Marathi
वरिष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येचा कोल्हापूरात निषेध करण्यात आला.
कोल्हापूर- वरिष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येचा आज दसरा चौकात कोल्हापूर प्रेस क्लबच्यावतीने निषेध करण्यात आला. यावेळी पत्रकारांनी निदर्शने करत हत्या करणाऱ्यांचा तपास करुन त्यांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली.
 
जेष्ठ पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांची गोळ्या झाडून मंगळवारी रात्री हत्या करण्यात आली. या संपूर्ण घटनेची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, हा पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वात्ंत्र्यावर झालेला हल्ला असल्याचे प्रेस क्लबचे उपाध्यक्ष तानाजी पोवार यांनी यावेळी सांगितले. लेखणीचा आवाज दाबण्याचा हा प्रकार सुरू आहे तो बंद झाला पाहिजे असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.  
 
पानसरे, दाभोलकर, कलबुर्गी आणि आता गौरी लंकेश यांच्यावरील हल्ला ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य नष्ट करण्याचा प्रयत्न आहे. सरकारने याची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. त्यानंतर गौरी लंकेश यांना कोल्हापूर प्रेस क्लब च्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. कोल्हापूर प्रेस क्लबचे सर्व पदाधिकारी व सदस्य यावेळी उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...