आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्विमिंग टँकमध्ये बुडून मिरजला युवतीचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली - सुटीसाठी मामाकडे आलेल्या बारावीतील विद्यार्थिनीचा शासकीय क्रीडा संकुलातील स्विमिंग टॅँकमध्ये बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी मिरजमध्ये घडली. र्शुती र्शीपाल ऐतवडे (वय 17) असे मृत युवतीचे नाव असून ती मूळची बेळगाव जिल्ह्यातील रहिवासी आहे.

मिरज येथे ऑलिम्पिक दर्जाचा स्वीमिंग टँक आहे. मुलांच्या सुरक्षिततेसाठी चार लाइफगार्ड शासनाने नियुक्त केले आहेत. मात्र मंगळवारी सकाळी एकच लाइफगार्ड कामावर होता. र्शुती आपल्या मामासोबत पोहायला शिकण्यासाठी येथे आली होती. तिने तलावात उडी मारताच सुरक्षिततेसाठी बांधलेला फ्लोटर तुटला आणि ती बुडू लागली. प्राण वाचविण्यासाठी तिने आरडाओरडा केला; मात्र कोणाचेच लक्ष गेले नाही. काही वेळाने उद्योजक माधवराव कुलकर्णी यांनी तलावात उडी मारून तिला बाहेर काढले; मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.