आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आणखी एका अल्पवयीन मुलीवर कोल्हापुरात बलात्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर - चांदीसाठी प्रसिद्ध असलेल्या हुपरी (ता. हातकणंगले) येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याचे उघडकीस आल्यानंतर बुधवारी संतप्त जमावाने संशयिताच्या घराची तोडफोड करत संताप व्यक्त केला. या प्रकरणी रमजान मोहम्मद घुडूभाई (वय 35) याला पोलिसांनी सांगली येथून अटक केली आहे. घटनेच्या निषेधार्थ काही युवकांनी एसटीवरही दगडफेक केली तसेच ठिकठिकाणी टायर जाळले.

दोन दिवसांपूर्वीच कोल्हापूर शहरात झारखंडच्या नराधमाने दोन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केले होते. नागरिकांनी या आरोपीला चोप देत पोलिसांच्या हवाली केले. तसेच मनसे व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शहरातील अनेक परप्रांतीयांना मारझोडही केली होती. त्यापाठोपाठ बलात्काराचे आणखी एक प्रकरण उजेडात आले आहे.

हुपरी येथील पीडित शालेय विद्यार्थिनी मंगळवारी दुपारी शिष्यवृत्तीसाठीची कागदपत्रे बँकेत देऊन शाळेकडे परत जात होती. याचवेळी रमजान गाडी घेऊन आला व शाळेत सोडण्याच्या निमित्ताने तिला गाडीत बसविले. मात्र शाळेकडे न नेता औद्योगिक वसाहतीत नेऊन रमजानने तिच्यावर बलात्कार केला. ही घटना बुधवारी सकाळी गावात समजली. रमजान मात्र पसार झाला होता. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी रमजानच्या कुटुंबीयांना घरातून बाहेर काढून घरावर दगडफेक केली. तसेच टीव्ही व तिजोरीही फोडली. या घटनेला जातीय रंग दिला जात असल्याने गावात पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.