आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूर: 'गोकुळ'चे संचालक सुरेश पाटील यांचे अपघाती निधन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र- अपघातानंतर स्कॉर्पिओची अवस्था अशी झाली आहे)
कोल्हापूर- कोल्हापूरमधील गोकूळ सहकारी दूध संघ या संस्थेचे विद्यमान संचालक सुरेश पाटील (57) यांचा शुक्रवारी रात्री अपघाती मृत्यू झाला. नदीच्या कठड्याला स्कॉर्पिओ धडकली व गाडी नदीपात्रात पडली. या अपघातात सुरेश पाटील यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती. त्यानंतर त्यांना कोल्हापूर मधील सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र त्यांना मृत घोषित करण्यात आले. या अपघातात त्यांच्या पत्नी, मुलगा, सून आणि नात आदी कुटुंबियही जखमी झाले आहेत त्यांच्यावरही सिटी हॉस्पिटलमध्येच उपचार सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश पाटील आपल्या कुटुंबियांसह गडहिंग्लजला एका देवीच्या यात्रेला काल सकाळी गेले होते. यात्रेवरून येण्यासाठी काल रात्री त्यांच्या कुटुंबियांना उशीर झाला होता. रात्री दीड-दोनच्या सुमारास कोल्हापूरजवळील भोगावती तुळशी नदीच्या पुलाच्या कठड्याला त्यांची स्कॉर्पिओ गाडी धडकली आणि अपघात झाला. अपघातात पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी, मुलगा- सून व नात जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सुरेश पाटील हे मागील 15 वर्षापासून ‘गोकूळ'च्या संचालक म्हणून कार्यरत होते. नुकत्याच झालेल्या गोकुळच्या निवडणुकीत त्यांची फेरनिवड झाली होती.
बातम्या आणखी आहेत...