आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

75 तोळे सोने लंपास

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर - राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या निवासस्थानाच्या परिसरातच असणा-या कसबा बावडा नागरी सहकारी पतसंस्थेच्या लॉकरमधून तब्बल 75 तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत. या घटनेने पोलिस खाते खडबडून जागे झाले असून गृहराज्यमंत्र्यांनीही अधिका-यांना तातडीने तपासाचे आदेश दिले आहेत.
पाटील हे कोल्हापुरातील कसबा बावडा येथे राहतात. त्यांच्या निवासस्थानाच्या परिसरातच ही पतसंस्था आहे. सकाळी 11 नंतर जेव्हा पतसंस्थेचे कार्यालय उघडण्यात आले त्या वेळी ही चोरी झाल्याचे व्यवस्थापकांच्या लक्षात आले. यानंतर संस्थेच्या पदाधिका-यांना याबाबत कल्पना देण्यात आली. दरम्यान, ही बातमी शहरात पसरताच सर्वत्र खळबळ उडाली.