आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महालक्ष्मीसाठी 24 कॅरेट सोन्याने मढवणार सुवर्ण पालखी; दान स्वीकारणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीसाठी सुवर्ण पालखी तयार करण्यासाठी एका ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे. १६ एप्रिल रोजी ट्रस्टच्या कार्यालयाचे उद्घाटन, सुवर्ण व निधी संकलनाचा प्रारंभ होणार आहे. श्रीमंत शाहू महाराज, करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांच्या हस्ते हे कार्यक्रम होणार आहेत. सध्याच्या पालखीला २४ कॅरेटच्या सोन्याने मढवण्यात येणार आहे.
पहिल्याच दिवशी ५ किलो सोने संकलित होईल, असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला. मात्र, या निधी संकलनासाठी पावती पुस्तके काढलेली नाहीत. ट्रस्टच्या नावे देणगी स्वीकारली जाईल, असेही ते म्हणाले.

अंबाबाईची पूर्ण पालखी ४० किलो सोन्याने मढवायची असल्याने यासाठी ३ महिने लागणार आहेत. त्यासाठी एकाच ठिकाणी सराफा कारागिरांची सोय केली असून अनेक सीसीटीव्ही कॅमे-यांच्या सहकार्याने या कामात पारदर्शकता ठेवण्यात येणार आहे.