कोल्हापूर- कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी दोन महत्त्वाचे सुगावे विशेष चौकशी पथकाच्या (एसआयटी) हाती लागले आहेत. एसअायटीला दोन ठिकाणचे सीसीटीव्ही फूटेज मिळाले असून दोन मोटरसायकल आढळल्या असल्याची माहिती अप्पर पोलिस महासंचालक संजयकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कॉम्रेड पानसरे यांच्या दोन्ही मारेकर्यांची रेखाचित्रे एसआयटीने जारी केले आहेत. मारेकरी 20 ते 25 वयोगटातील असू शकतात. तसेच ते कोणत्या मार्गाने पळाले हे स्पष्ट झाल्याचे संजय कुमार यांनी सांगितले यावेळी सांगितले. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने मारेकर्यांना पकडण्यात पोलिसांना यश येईल, असा दावा एसआयटीच्या अधिकार्यांनी केला आहे.
दरम्यान, गोविंद पानसरे यांच्यासह त्यांच्या पत्नीवर 16 फेब्रुवारी रोजी सागरमळा परिसरात दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या होत्या. या हल्ल्यात पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा जखमी झाल्या होत्या. मात्र, मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना 20 फेब्रुवारी रोजी गोविंद पानसरे यांची प्राणज्योत मालवली.
पुढील स्लाइडवर क्लिक वाचा, राज्य शासनाने जाहीर केले 25 लाखांचे बक्षीस...