आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Govind Pansare Murder Case Letter To Eye Witness

पानसरे हत्याकांड: सनातनने दिले प्रत्यक्षदर्शी मुलाबाबत पत्र, पालकांमध्‍ये भीती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - कॉ. गोविंद पानसरे यांच्‍या हत्या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी असलेल्‍या शाळकरी मुलाच्या जीविताबाबत काळजी व्यक्त करणारे एक पत्र सनातन संस्थेने पोलिसांना पाठवले आहे. मुळात या पत्रातील मजकूर म्‍हणजे प्रत्यक्षदर्शी मुलाच्या कुटुंबियांमध्‍ये भीती पसवरणारा आहे. ''प्रत्यक्षदर्शीची काळजी घ्या.'' असे या पत्रातून सूचवले आहे.
संजीव पुनाळकर यांनी सनातनच्‍या वतीने संस्‍थेच्‍या लेटरहेडवर राजारामपूरी पोलिस ठाण्‍याच्‍या निरीक्षकांना हे पत्र पाठवले आहे. प्रत्यक्षदर्शी मुलाच्या जीवितास काही बरे वाईट झाले तर त्याचे खापर सनातन संस्थेवर फोडण्‍यात येऊ नये. त्‍या मुलाला संरक्षण पुरवण्यात यावे, असा मजकूर या पत्रात असल्‍याची माहिती आहे. त्‍यामुळे हे पत्र मुलाविषयी काळजी व्‍यक्‍त करणारे आहे की, धमकी देणारे? याबाबत उलटसुटल चर्चेला तोंड फुटले आहे. मात्र, प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्याचे पालक या पत्रामुळे अस्वस्थ आहेत.
सनातनच्‍या पत्रामुळे खळबळ
- प्रत्‍यक्षदर्शीच्‍या सुरक्षेची जबाबदारी आमची नाही असे पत्रात म्‍हटले आहे.
- सनातनने लिहीलेल्‍या पत्रातील भूमिकेबद्दल संशय व्यक्त केला जातोय.
- या पत्रात मुलाच्या दिनक्रमची माहितीही देण्‍यात आली.
- या पत्रामुळे मुलाच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून वाचा, मुलाने पोलिसांकडे काय दिली होती साक्ष..