आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साडवीलकर याने शस्त्रे कोणास विकली याची चौकशी करण्याची समीर गायकवाडची मागणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संजय साडवीलकर याने कोणास शस्त्रे विकली याची चौकशी करण्याची मागणी समीर गायकवाड याने केली आहे. - Divya Marathi
संजय साडवीलकर याने कोणास शस्त्रे विकली याची चौकशी करण्याची मागणी समीर गायकवाड याने केली आहे.

कोल्हापूर- कॉ. गोविंदराव पानसरे यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयासमोर साक्षीदार म्हणून जबाब देणाऱ्या संजय साडवीलकर याने आपण काही वर्षांपूर्वी अवैध शस्त्रे विकत असल्याचा व दुरुस्त करत असल्याचा जबाब दिला होता. अशी शस्त्रे त्यांनी  कुणाकुणाला विकली आणि त्यातून पुढे काय झाले याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी तक्रार कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला आणि सद्या तुरुंगातून जामिनावर सुटलेल्या समीर गायकवाडने कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलिस ठाण्यात केली आहे. त्याच्यासोबत त्याचे वकील समीर पटवर्धन सुद्धा उपस्थित होते.

 

नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील साक्षीदार संजय साडवीलकर यांनी न्यायाधिशांसमोर साक्ष देताना फौजदारी दंडसहिता कलम 164 नुसार दिलेल्या जबाबात वर्ष 1985 ते 1988 या कालावधीत माझ्याकडे उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नसल्याने गावठी पिस्तुले खरेदी करणे, विक्री करणे, याची दुरुस्ती करणे आणि तयार करणे, हा व्यवसाय आपण करत होतो, असा कबुली जबाब दिला होता.यावरून आज समीर गायकवाड याने ही तक्रार दिली आहे. यासाठी त्याने जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांच्याकडे रीतसर परवानगी मागितली होती.

 

न्यायालयाने परवानगी दिल्याने तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या समीर गायकवाड सोबत  शिवसेनेचे कागल शहरप्रमुख किरण कुलकर्णी, हिंदु एकता आंदोलनाचे शिवाजीराव ससे, कुंभार समाजाचे बाळासाहेब निगवेकर, शिवसेनेचे  किशोर घाटगे, पतीत पावन संघटनेचे जिल्हाध्यक्ष  सुनील पाटील, कागल येथील श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे दिलीप पाटील, शिवसेनेचे  पवन पाटील, हिंदु जनजागृती समितीचे सुधाकर सुतार, शिवानंद स्वामी, मधुकर नाझरे उपस्थित होते.  

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...