आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉ.पानसरे हत्याप्रकरण: सारंग अकोलकर, विनय पवार विरोधात अजामीनपात्र वॉरंट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- पुरोगामी विचारवंत कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेचे साधक आणि संशयित फरार आरोपी विनय पवार आणि सारंग आकोलकर या दोघांच्या विरोधात जिल्हा सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी अजामीनपात्र वॉरंट बजावला आहे. एसआयटीने 20 फेब्रुवारी 2017 रोजी न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर झालेल्या सुनावणीत कोर्टाने हे निर्देश दिले.

गोविंदराव पानसरे आणि पत्नी उमा यांच्यावर 16 फेब्रुवारी 2015 रोजी अज्ञातांनी गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कॉ.गोविंदराव पानसरे यांचा 20 फेब्रुवारी रोजी मुंबईतील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी 16 सप्टेंबर 2015 रोजी सनातन संस्थेचा साधक असलेल्या समीर गायकवाडला अटक केली होती.
समीरच्या चौकशीतून  समोर आलेल्या माहितीच्या आधारावर एसआयटीने पवार आणि अकोलकर यांच्या अटकेसाठी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर शोध मोहीम राबवली होती. मात्र या दोघांनाही पकडण्यात तपास यंत्रणेला यश आले नाही. अखेर 20 फेब्रुवारी 2017 रोजी एसआयटीच्या वतीने विनय पवार आणि सारंग अकोलकर या दोन्ही फरारी आरोपीं विरोधात अजामीनपात्र वॉरंट लागू करावा यासाठी जिल्हा सत्र न्यायाधीश एल.डी.  बिले यांच्याकडे अर्ज करण्यात आला होता.
बातम्या आणखी आहेत...