आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या: संशयित आरोपींची माहिती देणाऱ्यास 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- गोविंद पानसरे हत्याप्रकरणी संशयित आरोपी विनय बाबूराव पवार, सारंग  दिलीप अकोळकर यांची माहीती देणार्‍यास राज्य शासनातर्फे 10 लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील आणि जिल्हा अतिरिक्त पोलिस  अधीक्षक सुहेल शर्मा यांची पत्रकार परिषदेत माहिती द‍िली.

गोविंद पानसरे यांच्या हत्येतील फरार आरोपी विनय पवार आणि सारंग अकोलकर यांची माहिती देणाऱ्याला 10 लाख रुपयांचे बक्षीस देण्याचा प्रस्ताव गृहविभागाने आज (बुधवारी) मंजूर केल्याचे विश्वास नागरे पाटील यांनी यावेळी सांगितले. सारंग दिलीप अकोलकर हा पुण्याचा तर विनय पवार हा कराड येथील रहिवासी आहे. दरम्यान, यापूर्वी पानसरे हत्येप्रकरणी समीर गायकवाड आणि सनातन संस्थेचा साधक डॉ. वीरेंद्र तावडे यांना अटक केली होती.

फेब्रुवारी 2015 मध्ये झाला होता पानसरेंवर हल्ला...
गोविंद पानसरे यांच्यावर फेब्रुवारी 2015 मध्ये हल्ला झाला होता.

 
बातम्या आणखी आहेत...