आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Govt Develop Maharashtra's Dr. Babasaheb Ambedkar Memorial

बाबासाहेबांना वंदनासाठी लंडनमध्ये जाणार कोण? डाॅ. अांबेडकरांच्या नातवाचा सवाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा - ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या अापल्या देशातील वास्तूंचे संवर्धन व्हायला हवे. त्यांचे मुंबईतील स्मारक लवकरात लवकर उभे करायला हवे. बाबासाहेबांच्या वास्तव्याने पुनीत झालेले त्यांचे घर, शाळा अांतरराष्ट्रीय दर्जाची करायला हवी,’ अशी अपेक्षा डाॅ. अांबेडकरांचे नातू अशाेक अांबेडकर यांनी मंगळवारी व्यक्त केली. लंडन येथील बाबासाहेबांची वास्तू सरकार खरेदी करत अाहे, मात्र बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी तिथे जाणार काेण?’ असा सवालही त्यांनी सरकारला विचारला.

केंद्र सरकारने डॉ.आंबेडकरांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहेत. त्यात बाबासाहेबांशी संबंधित ज्या वास्तू आहे त्याचे नूतनीकरण, स्मारक करण्याचा प्रस्ताव आहे. त्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यात डॉ. आंबेडकर ज्या वास्तूत राहत होते, जिथे शिकले त्या जागेला भेट देण्यासाठी अशाेक अांबेडकर अाले हाेते.
‘सातारा येथे प्रस्तावित भीमाबाई आंबेडकर स्मारक उभे करण्याचे सरकार मनावर घेत नाही. त्याउलट बाबासाहेब लंडनमध्ये ज्या वास्तूत राहिले ती खरेदी करण्यासाठी सरकारकडे पैसे आहेत, मात्र देशातील स्मारके उभारण्यासाठी पैसे आणि इच्छाशक्ती नाही, याची खंत वाटते. भीमाई स्मारकास सरकार वेळ लावणार असेल तर आम्हाला आंदोलन करावे लागेल’, असा इशाराही अशाेक अांबेडकर यांनी दिला.