आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उच्चशिक्षितांना फुलशेतीचा लळा, जरबेरा, झेंडूची मुंबई, हैदराबादला विक्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - चौघेही उत्तम शिकलेले. यापैकी एक जण मुंबईत सॅाफ्टवेअर कंपनीत, एक बांधकामाची कामे घेतो, तर तिसरा इंजिनिअरिंग महाविद्यालयात प्राध्यापक; परंतु या चौघांनाही आपली माती खुणावत होती. त्यामुळे अापली नाेकरी, पगार अाणि आपलं काम एवढ्यापुरतं मर्यादित राहता या चौघांनीही फुलशेतीला सुरुवात केली. अाज लाखो रुपयांची फुलं हे तरुण मुंबई आणि हैदराबादला नियमितपणे पाठवत आहेत.

कृषी पदविका झालेला सुनील शंकर मोरबाळे आणि बीई इलेक्ट्राॅनिक्स करून मुंबईत सॅाफ्टवेअर कंपनीत नोकरी करत असलेला सचिन जयंत देशपांडे हे दोघेही कोल्हापूर जिल्ह्यातील खेडे (ता. अाजरा) या गावचे. सिद्धेश पांडुरंग नार्वेकर याने पुण्यातून एमटेक पूर्ण केले आणि तो कोल्हापुरातील इंजिनिअरिंग महाविद्यालयात प्राध्यापक अाहे. सुधीर बाबूराव कुंभार याने बीई सिव्हिल पूर्ण केले आणि तो काकांच्या व्यवसायात मदत करतो आणि स्वतंत्र कामेही घेतो.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपला व्यवसाय आणि नोकरी सांभाळत आपल्या गावाकडे शेती करण्याचा निर्णय या चौघांनी घेतला. उच्चशिक्षित असल्याने त्यांनी केवळ भावनेच्या भरात निर्णय घेता सर्वेक्षण केले. गरज ओळखली आणि खेडे येथील साडेपाच गुंठ्यांवर ग्रीन हाऊस उभारण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी चौघांनी प्रत्येकी लाख रुपये अशी लाखांची गुंतवणूक केली. जरबेराची लागवड केली. फुलांच्या दर्जामुळे त्यांना मुंबई आणि हैदराबादला फुले पाठवण्याची संधी मिळाली. गेली वर्षे ते सातत्याने या दोन्ही शहरांत फुले पाठवत आहेत.

ग्रीन हाऊसची साखळीच
याफुलशेतीतून मिळालेला पैसा पुन्हा प्रकल्पामध्ये गुंतवला. बँकेचे कर्जही घेतले आणि दुसऱ्याच वर्षी आणखी गुंठ्यांचे ग्रीन हाऊस उभारले. पुढच्याच वर्षी एकरांमध्ये झेंडू घेतला आणि तो मुंबईला पाठवला. आता यंदा १० गुंठ्यांमध्ये केळी घेण्याचे नियोजन सुरू आहे. अशा पद्धतीने त्यांच्या शेतीचा विस्तार सुरू अाहे. सुनील शेतीचे नियोजन करतो. मुंबईत असलेला सचिन तिथले व्यवहार पाहतो. सिद्धेश रोज नोकरीनंतरचा वेळ शेतीसाठी देतो. सुधीरही सुटीच्या दिवशी शेतावरच कार्यरत असतो.