आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gun In Mahalaximi Temple ; Shivsena's District Chief Chargesheet

महालक्ष्मी मंदिरात रिव्हॉल्व्हर; शिवसेना जिल्हाप्रमुखावर गुन्हा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- महालक्ष्मी मंदिर परिसरात सोमवारी रिव्हॉल्व्हर घेऊन जाणारे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच यापुढे मंदिर परिसरात आंदोलनाला परवानगी न देण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला आहे.

सोमवारी शिवसेनेने महालक्ष्मी मंदिर परिसरातील गैरसोयींबाबत आंदोलन केले होते. जिल्हाप्रमुख पवार, जिल्हाप्रमुख विजय देवणे व शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली होती. पवार यांनी तर रिव्हॉल्व्हर नेऊन पोलिस सुरक्षा व्यवस्था कुचकामी असल्याचा आरोप केला होता. तसेच साडीविक्रेत्याकडील साड्या या अपु-या लांबीच्या असल्याचेही दाखवून देत भक्तांची लूट होत असल्याचा आरोप केला होता.
या प्रकरणाची दखल घेत पोलिस अधीक्षक विजयसिंह जाधव यांनी बैठक घेऊन मंदिर परिसरात आंदोलनाला बंदी घालत असल्याचे जाहीर केले.

शस्त्र परवाना होणार रद्द
संजय पवार यांनी बेकायदेशीरपणे रिव्हॉल्व्हर मंदिर परिसरात नेले, त्याचे प्रदर्शन करून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून शस्त्र परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव पोलिसांनी जिल्हाधिका-यांना दिला आहे.