आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे, नांदेडला होणार हज हाऊस : नसीम खान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर - सध्या मुंबई, औरंगाबाद आणि नागपूर येथे हाज हाऊस आहेत. पुणे आणि नांदेड येथे आता हाज हाऊस उभारणार असल्याची माहिती वस्त्रोद्योग व अल्पसंख्याक मंत्री नसीम खान यांनी पत्रकार परिषदेत दिली. मुस्लिमांच्या विविध विकास योजनांबाबत त्यांनी या वेळी माहिती दिली.

शहरांच्या विस्तारानुसार कबरस्तानच्या विकासासाठी 25, 15 आणि 10 लाख रुपयांचा निधी देण्यात येणार असून ग्रामपंचायतींनाही याच पद्धतीने निधी देणार आहे. तसेच 450 ग्रामपंचायतींना यंदा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. मुस्लिमांच्या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी मयुद्दीन रहमान यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती नेमण्यात आली असून त्या शिफारशी आल्यानंतर अंमलबजावणीसाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हजला जाण्याच्या महाराष्ट्राच्या यात्रेकरूंच्या संख्येत घट करू नये यासाठी आपण केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांची भेट घेतली आहे.

वस्त्रोद्योगात 40 हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित
राज्यामध्ये वस्त्रोद्योगात 40 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून त्यातून 12 लाख रोजगार निर्माण होणार आहे. सध्या 4000 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून 25 हजार जणांना रोेजगार उपलब्ध झाल्याचे खान यांनी सांगितले.